---Advertisement---

धक्कादायक : नुकसान भरपाई न मिळाल्याने भाजप आमदाराचे निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !

By team
On: June 14, 2025 6:54 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याच्या संतापाने आता भाजपचे आमदार संजय कुटे यांचे निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव जामोद येथे हा प्रकार घडला. संग्रामपूर तालुक्यातील एका अतिवृष्टी पीडित शेतकऱ्याने नुकसान भरपाई न मिळाल्याने संतापाच्या भरात हे कृत्य केले. याप्रकरणी, संबंधित शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्याच्या अनेक भागांमध्ये यंदा मे महिन्याच्या शेवटीच जोरदार पावसाने हजेरी लावली. परिणामी, शेतपिकांसह फळबागांचेही मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असतानाही, शासनाच्या मदतीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत अजूनही कोणतीही ठोस मदत पोहोचलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान होऊनही त्याचा मोबदला न मिळाल्याने, संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुड यांनी आपला संताप व्यक्त करत, थेट भाजप आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानात पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी आमदार संजय कुटे हे आपल्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी उपस्थित होते. विशाल मुरुड यांनी बंगल्याच्या परिसरात प्रवेश केला. त्यांच्या हातात पेट्रोलचे कॅन होते. “माझ्या शेतात अतिवृषटीमुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला अद्याप मिळाला नाही. त्यामुळे मी आमदारांचा बंगला जाळून टाकतो,” असे म्हणत ते थेट प्रवेशद्वाराच्या दिशेने मार्गक्रमण केले.

शेतकरी विशाल मुरुड हे बंगल्याच्या प्रवेशद्वाराकडे जात असताना आमदार कुटे यांचे स्वीय सहायक सतर्क झाले आणि त्यांनी विशाल मुरुड यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत, विशाल मुरुड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (BNS) अंतर्गत कलम 333 आणि 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील चौकशी जळगाव जामोद पोलिस करत आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!