---Advertisement---

धक्कादायक : रासप नेते सुनील बंडगर यांचे निधन ; आज निघणार अंत्ययात्रा !

By team
On: July 14, 2025 9:24 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांचे सोमवारी पहाटे २ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यामध्ये निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 55 होते.

सुनिल बंडगर हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण व शेतकरी प्रश्नांवर सक्रियपणे कार्यरत होते. संयमी, सुसंस्कृत आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन कार्यात सोलापूर शहर जिल्हा अक्कलकोट व मैंदर्गी परिसरात भक्कम घडी बसवली गेली होती. सर्व पक्षांशी त्यांचे संबंध चांगले होते एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय होता मूळचे बिल्डिंग कॉन्टॅक्टर असलेले बंडगर यांनी अल्पावधीतच अक्कलकोट तालुक्याच्या राजकारणामध्ये त्यांनी चांगला जम बसवला होता सर्वांना हवे हवेसे व्यक्तिमत्व अचानक निघून गेल्याने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या निधनाबद्दल सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्याबरोबर त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते रासपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर अक्कलकोट तालुक्यात त्यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती अंत्ययात्रा आज दुपारी २.०० वाजता मैंदर्गी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. बंडगर यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय आणि स्थानिक वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुनील बंडगर यांचे संबंध सर्वपक्षीय नेत्यांशी होते त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे बंडगर परिवारावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशी भावना रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी व्यक्त केली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!