---Advertisement---

“श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची पूरग्रस्तांसाठी सढळ मदत; पाचव्या दिवशीही मदतकार्य सुरू”

By team
On: September 15, 2025 4:27 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून तालुक्यातील पूरग्रस्तांना सढळ मदतीचा हात पुढे करत आजच्या पाचव्या दिवशीही मोट्याळ येथील बाधीतांना फूड पाकीट देण्यात आले आहे.

दरम्यान गेल्या पाच दिवसापासून तालुक्यातील पूर्व भागातील गाव, वाड्या, वस्त्या, तांड्यांना मुसळधार पावसाच्या सामान्या बरोबरच पूरपरिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये ग्रामस्थांसह महसूल व पोलीस कर्मचारी मदतीकरिता सतत कार्यरत असताना तालुक्यातील एकमेव धार्मिक न्यास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने तात्काळ मदत देण्याकरिता पुढे आले आहे. बाधीतांना डोअर टू डोअर फूड पाकीट देण्याचे काम गेल्या पाच दिवसापासून निरंतन देण्याचे काम सुरुच आहे.

सोमवारी तालुक्यातील मोट्याळ गावात पुराचा मोठ्या प्रमाणात पुराचा तडाखा बसल्याने अन्नछत्र मंडळाकडून त्वरित फूड पाकिटाची व्यवस्था करण्यात आली.

यावेळी मोट्याळ गावचे विनोद पवार, अनिल साळुंके, प्रमोद जंगाले, धनंजय काळे, राम काळे, बाळासाहेब जाधव हे उपस्थित होते. याप्रसंगी न्यासाचे सचिव शामराव मोरे, प्रवीण घाडगे, रोहन शिर्के, सिद्धाराम कल्याणी, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी, कुमार सलबत्ते, चंद्रकांत हिबारे, श्रीशैल माळी, शहाजी यादव, खंडेराव होटकर, शिव काळे, रोहित कदम, शरद भोसले, नाम भोसले, महेश पाटील, शांतप्पा मठपती आदीजणासह न्यासाचे पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी व अमोलराजे भोसले मित्र परिवार उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!