अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सिद्धाराम – शंकर प्रतिष्ठानच्या पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राने सर्वाधिक पोलीस भरती करून नवा उच्चांक गाठला आहे.नुकत्याच झालेल्या राज्य सरकारच्या पोलीस भरतीत तब्बल ७५ पोलीस हे या प्रशिक्षण केंद्रातून पुढे आले आहेत,असा दावा या केंद्राचे व्यवस्थापकीय प्रमुख प्रा.धनराज भुजबळ यांनी केला आहे. याबाबतची माहिती देताना ते पुढे म्हणाले की, २००५ साली जेंव्हा पहिली बॅच झाली.तेंव्हा ६२ मुले हे भरती झाले होते. बऱ्याच वेळा शासनाकडून भरती प्रक्रियेला विलंब होतो परंतु आम्ही मात्र मुलांकडून तयारी हे करून घेतच असतो आणि यात बऱ्याच मुलांनी यशस्वी झेप घेतली आहे.परिवहन विभागाचे उपयुक्त विद्यासागर हिरमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज सुरू आहे.
या संस्थेचे मुख्य आधारस्तंभ राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि शंकर म्हेत्रे हे आहेत. वीस वर्षांमध्ये राज्याच्या पोलीस दलात साडे तीन हजार पेक्षा जास्त पोलीस झाले आहेत.त्याशिवाय परत वेग – वेगळ्या क्षेत्रात साडे तीन हजार विद्यार्थी यशस्वी झाले आहेत,असेही ते म्हणाले. संस्था स्थापन केल्यापासून ज्या मुलांना नोकरी लागले ते मुले केवळ स्वतःसाठी नोकरीला लागले नाहीत तर तेवढे कुटुंब देखील आज सुखी आहेत याचा आम्हाला विशेष आनंद आहे. गेल्या वर्षी भरामध्ये ७५ महाराष्ट्र पोलीस, १८ सीआरपीएफ,२३ आर्मी,२९ स्टाफ सिलेक्शन,२ तलाठी तर १ जण ग्रामसेवक झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना व्यवस्थापकीय प्रमुख धनराज भुजबळ,शंकर सौदागरे,दादासाहेब खराटे यांचे मार्गदर्शन लाभले.या प्रशिक्षण केंद्रात राज्यभरातील विद्यार्थी येतात आणि त्यांना शारीरिक, बौद्धिक,सुसंस्कृत शिक्षणाबरोबर योग, ध्यान द्वारे सकस आहार दिला जातो. अडीचशे मुले सध्या प्रशिक्षण घेत आहेत.
जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याने यश
भरती प्रक्रियेला जे योग्य प्रकारचे मार्गदर्शन लागते. ते मार्गदर्शन मला या केंद्रातून मिळाले. विशेष म्हणजे जी मुले मेहनत करतात त्यांच्या पदरी हे यश असतेच. माझे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले. मुलांनी या गोष्टीसाठी सहज प्रयत्न न करता जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते.
देविदास पाटील,एसआरपीएफ बासलेगाव