लोकमान्य गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धाराम टाके यांची निवड
दशकपूर्ती वर्षानिमित्त वृक्षारोपण व सामाजिक उपक्रमांचे नियोजन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शहरातील जुना आडत बाजार येथील प्रसिद्ध श्री लोकमान्य गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी लोकमान्य उद्योग समूहाचे प्रमुख सिद्धाराम टाके यांची निवड करण्यात आली. मंडळाचे मार्गदर्शक व माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
या बैठकीत यावर्षीचे पदाधिकारी निवडण्यात आले असून गणेशोत्सवाचे नियोजन, सामाजिक उपक्रम आणि दशकपूर्ती कार्यक्रमाचे आराखडे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मंडळाचे यंदाचे हे दहावे वर्ष असून दशकपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी नूतन अध्यक्ष टाके म्हणाले,या मंडळाने गेल्या दहा वर्षांमध्ये फक्त गणेशोत्सवच नव्हे, तर समाजोपयोगी उपक्रमांतही सातत्याने सहभाग घेतला आहे. यावर्षीही वृक्षारोपणासह अनेक नवे उपक्रम राबवण्याचे नियोजन असून गणेशोत्सव अधिक प्रभावी व लोकोत्सव स्वरूपाचा करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
मंडळाची वाटचाल आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिलन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होत असून मंडळ सामाजिक कार्यात अग्रेसर
राहिले आहे. यंदा शासनाकडून मिळालेल्या सकारात्मक निर्णयामुळे उत्सवात नवे उपक्रम साकारण्यास संधी मिळणार असल्याचेही
टाके यांनी नमूद केले.
इतर नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत –
▪️ उपाध्यक्ष : गुंडू कांदे, आकाश विभुते
▪️ सचिव : महेश पाटील, प्रज्वल गवंडी, आदर्श पडणुरे
▪️ खजिनदार : संदेश उंबराणीकर
या बैठकीस मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवाच्या नियोजनास सुरुवात झाली असून शहरातील एक प्रेरणादायी गणेश मंडळ म्हणून ‘श्री लोकमान्य गणेशोत्सव मंडळ’ आपली परंपरा यंदाही भक्कमपणे सुरू ठेवणार आहे.