---Advertisement---

सोलापूर शहराच्या संचारबंदी उद्यापासून महत्त्वाचा बदल,आता ७ ते १ वेळ महत्वाची !

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर,दि.१६ : सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व किराणा दुकाने,भाजीपाला दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, मटन चिकन, अंडी आणि मासे विक्रीची दुकाने व सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने तसेच पाळीव प्राण्यांचे खाद्य दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत चालू राहतील.

प्रत्येक दुकानदारांनी कोविड- १९ चे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक राहील.शहरातील दुकानदारांनी रॅपिड अँटीजन टेस्ट अथवा आर टी पी सी आर किंवा स्वतःचे लसीकरण केलेबाबातची माहिती आपल्या दुकानात लावणे बंधनकारक असेल.

तसेच दूध संकलनासाठी डेयरी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत सुरू राहतील.अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांच्या मालकांनी ग्राहकांना उभे राहण्याकरिता किमान एक मीटर अंतरावर गोल रिंगण आखणे आवश्यक राहील व भारत सरकारच्या दिलेल्या निकषानुसार लवकरात लवकर लसीकरणं करून घ्यावे सर्व दुकानदारांनी कोविड -१९ बाबत सुरक्षेचे सर्व उपाय जसे की पारदर्शकता काचेतून ग्राहकांशी संवाद साधने किंवा फेशिल्ड,इलेक्ट्रॉनिक पेमेंट इत्यादीचे काटेकोर पणे वापर करावे तसे न केल्यास महानगरपालिकेच्यावतीने त्यांच्यावर ती कारवाई करण्यात येईल,अशी माहिती आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!