---Advertisement---

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे सोलापूर येथे आगमन

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि.4(जिमाका):- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आज सकाळी 10 वाजता हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळाच्या हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी सोलापूर महापालिकेच्या महापौर श्रीमती श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिकेचे आयुक्त पि. शिवशंकर, सोलापूर शहर पोलीस आयुक्त हरीश बैजल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती मृणालिनी फडणवीस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम आदि उपस्थित होते.
प्रारंभी सोलापूर महापालिकेच्या प्रथम नागरिक महापौर श्रीमती यन्नम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल महोदयांचे स्वागत केले. त्यानंतर पोलीस बँड पथकाने मानवंदना दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!