अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
खेळामुळे मुलांचे जीवन समृद्ध होण्याबरोबरच तंदुरुस्त होते. त्यामुळे मुलांनी खेळाकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन निवृत्त मंडल अधिकारी बसवराज लोंढे यांनी केले.अक्कलकोट फत्तेसिंह क्रीडा संकुलन येथे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचे उद्घाटन निवृत मंडल अधिकारी बसवराज लोंढे व आंतरराष्ट्रीय खेळाडू काशिनाथ अस्वले यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. जगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे खेळातही तीच परिस्थिती आहे ग्रामीण भागातील मुले मोठ्या अपेक्षा नाही तालुकास्तरावर व जिल्हा स्तरावर प्रयत्न करतात.यातील अनेक खेळाडू हे राष्ट्रीय पातळीवर देखील चमकले आहेत त्यांचा आदर्श घेत मुलांनी अभ्यासाबरोबर खेळाकडेही लक्ष केंद्रित करावे, असे लोंढे यांनी सांगितले.
प्रारंभी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद प्रतिमेचे फोटो पूजन व राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. क्रीडा प्रमुख उमेश नेवाळे, उपप्रमुख नागराज कलबुर्गी, क्रीडा समन्वयक परमेश्वर व्हसुरे,क्रीडा मार्गदर्शक अविनाश राठोड, मैदानी प्रमुख प्रकाश सोनटक्के आदिंसह तालुक्यातील क्रीडा शिक्षक बाबुराव पवार ,दयानंद उटगे ,चिदानंद बाबा, अभिजीत लोके, ज्ञानेश्वर कदम, विजयकुमार जेऊरेंसह तालुक्यातील क्रीडा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.या स्पर्धा इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्या आहेत,असे राठोड यांनी सांगितले.