विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे संवर्धन करून जीवन समृद्ध करावे : मारुती बावडे
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नागणसूर येथे कार्यक्रम
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांनी दैनंदिन वृत्तपत्रे, पुस्तके वाचून, रेडिओ ऐकून, सोशल मीडिया व मोबाईलच्या माध्यमातून मराठी भाषाचे ज्ञान अवगत करावे आणि मराठी भाषेची आवड स्वतःमध्ये निर्माण करावी,असे आवाहन सोलापूर आकाशवाणीचे वृत्त निवेदक तथा पत्रकार मारुती बावडे यांनी केले.
नागणसूर येथील प्रचंडे प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन व उत्कृष्ट ग्रंथ वाचन पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य शंकर व्हनमाने हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. ईरण्णा धानशेट्टी व मारुती बावडे यांच्या हस्ते वि.वा शिरवाडकर व श्री एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार व श्रीफळ अर्पण करण्यात आले. त्यानंतर प्रा.प्रशांत नागूरे यांनी पाहुणे बावडे यांचा परिचय करून देऊन त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा येथोचीत सत्कार करण्यात आला.पुढे बोलताना बावडे यांनी इंग्रजी भाषा जरी आवश्यक असले तरी मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करून त्यात करिअर करावे.यासाठी प्रत्येकांनी भाषेचे संवर्धन तर करावे.
यामुळे खरोखरच आपले जीवन समृद्ध होईल,असे ते म्हणाले.याप्रसंगी प्रा.चिदानंद मठपती व अंजली धानशेट्टी, सुमय्या मुजावर, वैष्णवी कलशेट्टी या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे महत्त्व पटवून सांगितले. याप्रसंगी ग्रंथपाल प्रमिला शिवगुंडे यांच्यावतीने पहिली ते बारावी पर्यंतच्या उत्कृष्ट वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडीचे ग्रंथ व प्रमाणपत्र देऊन अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आले यावेळी प्रा. अनिल इंगळे, शरणप्पा मणूरे, सहशिक्षक बसवराज धानशेट्टी, प्रीती प्रचंडे, चन्नवीर कल्याण, सागर पोतदार आदिंसह विद्यार्थी – विद्यार्थिनी,पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ वाघमोडे यांनी केले तर आभार थावरू
चव्हाण यांनी मानले.