---Advertisement---

सुषमा अंधारेंचा विश्वास : ठाकरे गट इतक्या जागा जिंकणार

By team
On: April 23, 2024 10:30 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर सुरु असून दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट 13 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. तसेच नवनीत राणा म्हणजे चाराणे की मुर्गी आणि बाराणे का मसाला आहेत. ज्यांना रुमणं, कुळवं, दांडा, खुरपणं माहिती नाही, अशी माणसे कृषीमंत्री होतात असे म्हणत त्यांनी राज्य सरकारमधील अनेक नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

यावेळी सुषमा अंधारे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ”लोकसभा किंवा विधानसभा लढण्याची तयारी माझी नाही. मी कनिष्ठ मध्यमवर्गी आहे. कोणत्याही जाती धर्मात न गुंतता, महाराष्ट्र धर्म वाढवण्याची लढाई शिवसेनेला लढायची होती, त्यासाठी शिवसेना कटिबद्धपणे काम करत आहे. त्यामुळे विधानसभा माझ्या डोक्यात नाही. लोकसभेला ठाकरे गट 13 पेक्षा जास्त जागा जिंकेल”, असे अंधारे म्हणाल्या.

पुढे सुषमा अंधारे यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, ”जसा बाईचा विनयभंग होतो, तसा पुरुषाचा विनयभंग होतं नसेल का? जेव्हा नवनीत राणा म्हणतात की, उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, तेव्हा त्याचा अर्थ काय काढायचा?नवनीत राणा म्हणजे चाराणे की मुर्गी आणि बाराणे का मसाला अशा आहेत”, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.

पुढे अंधारे म्हणाल्या, ”मला महिला राजकारणी म्हणून निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे आणि नवनीत राणा यांच्यापैकी कोणीही आवडत नाहीत. त्या माझा विरोध असलेल्या पक्षात आहेत म्हणून नाही तर मला सुषमा स्वराज प्रचंड आवडत होत्या. मला इंदिरा गांधींची निर्णय क्षमता आवडायची. पण मला त्यातल्या त्यात वरिलपैकी मनिषा कायंदे आवडतील. त्यांच्यामध्ये भाबडेपणा आणि निर्दोषपणा आहे. कायंदे धुर्त आणि कपटी अजिबात नाहीत”, असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!