---Advertisement---

भरदिवसा तरुणावर तलवार हल्ला : आईमुळे वाचले प्राण

By team
On: August 19, 2024 10:34 AM
Follow Us:
---Advertisement---

कोल्हापूर : वृत्तसंस्था

राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांना नुकतेच कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून नांदणी नाका रस्त्यावर तरुणावर तलवार हल्ला झाल्याची घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. या हल्ल्यात सुनील रामाप्पा लमाणी (वय 28, रा. नांदणी नाका, लमाणी वसाहत धरणगुत्ती, ता. शिरोळ) हा जखमी झाला आहे. आईच्या सतर्कतेमुळे मुलाचा प्राण वाचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी विनोद कासू पवार, अरविंद कासू पवार (दोघे रा. कालीबागतांडा, एलटी विजयपूर), विनोद बाबू जाधव (रा. नांदणी नाका, लमाण वसाहत, धरणगुत्ती) या तिघांविरुद्ध जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असले तरी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सुनील लमाणी याचे वडील लघुशंकेकरिता गेले होते. सुनील व त्याची आई वाट पाहत रस्त्यावर थांबले होते. यावेळी तिघे संशयित मोटारसायकलवरून आल्यानंतर त्यातील विनोद पवार याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने सुनीलवर तलवारीने वार केला. पाठीवर वार झाल्याने सुनील जखमी झाला. त्यानंतर प्रतिकार करत सुनील व त्याच्या आईने संशयितांवर दगडफेक केल्यानंतर ते पसार झाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!