---Advertisement---

शिंदेंच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या ; रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांना मागणी !

By team
On: August 25, 2025 4:06 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बॅगभर पुरावे सादर केले. रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन केले, तसेच संजय शिरसाट यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली.

संजय शिरसाटांना त्यांच्या पदावरून काढा. कारण ते सुसाट सुटले. जर तुम्हाला पैशाची गरज लागली, तर शासनाकडे या. शासनाचे पैसे संपले, तर माझी बॅग उघडी आहे, असे वक्तव्य त्यांनी कालच केले आहे. अशा भ्रष्ट्र माणसाला पदावर ठेवू नका. पुरावे आम्ही दिलेले आहेत. या सर्व प्रकरणाची शहानिशा होईपर्यंत ६१ हजार स्वेअर मीटरचा भूखंड हा ताबडतोब थांबवावा. ८ हजार स्वेअर मीटरचा भूखंड एका प्रायव्हेट व्यक्तीला दिलेला आहे. तो सुद्धा परत मागून घ्यावा. संजय शिरसाट यांचा दोन दिवसांत राजीनामा घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. गणपती होईपर्यंत आम्ही शांत राहू, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.

पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी बिवलकर कुटुंबांचा १९९३ चा अर्ज, सिडकोने फेटाळलेले आधीचे चार अर्ज, विधी व न्याय विभागाचा अहवाल, नगर विकास विभागाने १ मार्च २०२४ ला सिडकोला दिलेले पत्र, सिडकोचा ठराव आणि सिडकोचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र असे पुरावे माध्यमांसमोर दाखवले.

रोहित पवार म्हणाले, बिवलकर कुटुंबाचा साडेबारा टक्क्यासाठी अर्ज २८ जुलै १९९३ आला होता. या अर्जात त्यांनी सांगितले की, आम्ही चुकीचे ठरलो, तर आम्ही पूर्ण जमीन सिडकोला देणार आहोत. तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यास बिवलकर कुटुंब चुकीचेच ठरलेले आहेत.

रोहित पवार यांनी सिडकोने बिवलकरांचा अर्ज चार वेळा फेटाळल्याचे सांगितले. ते म्हणाले, १८ एप्रिल १९९४ रोजी पहिल्यांदा अर्ज फेटाळला. त्यानंतर १९९५ आणि २०१० मध्ये आधीचे कारण देत सिडकोने बिवलकर कुटुंबाचा अर्ज फेटाळून लावला.

रोहित पवार पुढे म्हणाले, विधी व न्याय विभागाच्या अहवालानुसार, आम्ही बिवलकरांना परवानगी दिली, असे विजय सेहगल यांनी सांगितले होते. पण त्यांनी सांगितलेले चुकीचे सांगितले आहे. विधी व न्याय विभागाने अहवाल दिल्यानंतर, त्यावर सिडकोने नकारात्मक भूमिका घेत, तो अहवाल चुकीचा असल्याचे म्हटले आहे. रोहित पवार म्हणाले की, मंत्री संजय शिरसाट यांनी सिडकोचे चेअरमन असताना हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. याबाबत पुरावे आम्ही सादर केले. त्यानंतर आमच्यावर काही लोकांनी टीका केली की महादेव यांना बुद्धी देवो. एकनाथ शिंदे यांनी टीका केली. मला शिंदे यांना सांगायचे आहे की, महादेवाने आम्हाला बुद्धी दिली आहे. तिचा वापर करून आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. आम्हाला देवेंद्र फडणवीस म्हणाले पुरावे सादर करा. आम्ही त्यांना देण्यासाठी १२ हजार पानांचे पुरावे बॅग भरून आणले आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!