---Advertisement---

एसटी-कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात : ५  ठार तर २६ जखमी !

By team
On: April 2, 2025 9:22 AM
Follow Us:
---Advertisement---

बुलढाणा : वृत्तसंस्था

राज्यातील महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलचा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघात घडला आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आले आहे. एसटी-कार आणि ट्रॅव्हल्सच्या अपघातात 26 हून अधिक जण जखमी आहेत. तर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी मदतकार्य सुरू केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-शेगाव मार्गावर जयपूर लांडे फाट्यासमोर आज सकाळी साडेपाचच्या सुमारास भरधाव कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. या तिहेरी अपघातामुळे रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!