---Advertisement---

ठाकरे बंधूंची भूमिका हिंदू विरोधी ; भाजप मंत्र्यांचा टोला !

By team
On: November 3, 2025 6:02 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील महाविकास आघाडीकडून ठरवून फेक नरेटिव्हची बांधणी केली जात आहे. त्यासाठी निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. मविआमधील अनेक नेत्यांच्या मतदारसंघात ते जितक्या मतांनी निवडून आले त्या पेक्षा जास्त मुस्लिम दुबार मतदार आहेत, असा आरोप भाजपचे नेते मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे. तर ठाकरे बंधूंना केवळ हिंदू दुबार मतदार दिसले असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात 5 हजार 532 दुबार मुस्लीम मतदार आहेत, पण आपल्या मतदारसंघात जी मत फायद्याची आहेत त्यावर विरोधकांकडून काही आक्षेप घेतला जात नाही. तिथे रोहित पवार 1 ते दीड हजार मतांनी निवडून आले. तर मुंब्रा मतदारसंघामध्ये 30 हजारांहून अधिक मुस्लीम दुबार मतदार आहेत. नाना पटोले यांच्या मतदारसंघात 400 हून अधिक मुस्लीम दुबार मतदार असून ते केवळ 208 मतांनी निवडून आले म्हणत जिथे आपला फायदा आहे त्या ठिकाणी दुबार मतदारांवर काही न बोलण्याची भूमिका मविआचे नेते घेत असल्याचा आरोप शेलारांनी केली आहे. वरुण सरदेसाई जिंकले 11,365 मतांनी. पण, त्यांच्या मतदारसंघात 13,313 हे मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदार आहेत.

आशिष शेलार म्हणाले की,आम्हाला मतदारांमध्ये भेद करण्याची इच्छा नाही. पण जे मतदारांमध्ये भेद करत आहे त्यांना उघडे पाडण्याचे काम आम्ही करत आहोत. जे दिसतंय ते लोकांसमोर आले पाहिजे म्हणून आम्ही आमची भूमिका मांडत आहोत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भूमिका पाहिली तर ते मतदार यंत्र, मतदान यादी, निवडणूक आयोग, निकाल याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे हा सर्व फेक नरेटिव्ह तयार केला जात आहे. जनता यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही.

आशिष शेलार म्हणाले की, राज ठाकरेंनी जे मतदारसंघ सांगितले त्यामध्ये केवळ त्यांना भोईर, पाटील असेच आडनावे दिसून आली. राज ठाकरेंना दुबार मतदारांमध्ये केवळ मराठी माणूसच दिसला का? दुबार मतदारांमध्ये केवळ हिंदू लोकच दिसले का? बडवायची भाषा मराठी, दलित आणि हिंदू मतदारांसाठी वापरत आहात. उद्धव ठाकरेंची भूमिका ही भूमिपुत्रांच्या विरोधातील दिसून येत आहे. राज ठाकरे यांना भोईर पाटील दिसले पण आसमा दिसली नाही.

आशिष शेलार म्हणाले की, कर्जत-जामखेड, इस्लामपूर, मुंब्रा, साकोली, उत्तम जानकर यांचा मतदारसंघामध्ये नाव एकसारखे आणि नंबर वेगळे आहेत. काही ठिकाणी नाव सारखे आहेत तर नाव एकसारखे आणि मतदार यादीतील नंबर दुसरा आहे. काही ठिकाणी नाव सारखे आहे तर लिंग वेगळे आहे. काही ठिकाणी पत्ते वेगळे दिले आहेत. काही ठिकाणी नाव वेगळे आहेत. तर काही ठिकाणी वडीलांचे नाव नाही, नावात अदलाबदल करण्यात आली आहे, शेख, अन्सारी यांचे दुबार मतदार चालतात कारण ते सोयीचे आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!