---Advertisement---

ठाकरेंचा खोचक टोला : भाजपचा गैरसमज…

By team
On: June 6, 2024 9:24 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीत सगळ्यांनी अफाट मेहनत घेतली. जिद्दीने लढा देऊन विजय मिळवला. तुमच्या प्रेमाला कधीही दगा देणार नाही. याचवेळी आम्हाला कोणी हरवू शकत नाही, असा भाजपचा जो गैरसमज होता, तोदेखील मतदारांनी दूर केला, असा टोला शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बुधवारी लगावला.

नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि मुंबई उत्तर पूर्वचे खासदार संजय दीना पाटील यांनी ‘मातोश्री’ वर जाऊन ठाकरेंची भेट घेतली. या विजयी उमेदवारांना ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यकर्त्यांनी पक्षासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल कौतुकाची थाप मारली. यावेळी ठाकरे म्हणाले, लढाईला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. या लढाईत चांगले यश मिळाले. मी निमित्त असलो तरी तुमची अफाट मेहनत, जिद्द आणि चिकाटीमुळे विजय संपादन करता आला. असेच प्रेम, आशीर्वाद पाठीशी राहू द्या. तुमच्या प्रेमाला कधीही दगा देणार नाही, असे सांगत ठाकरेंनी सर्वांचे आभार मानले. आम्हाला कोणी हरवू शकत नाही, असा भाजपचा गैरसमज होता, तोदेखील या विजयाने दूर केल्याचा खोचक टोला ठाकरेंनी लगावला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!