---Advertisement---

पोलीस स्थानकात भाजपच्या नेत्याने केली महिलेला मारहाण

By team
On: August 7, 2024 2:37 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने महिलेला पोलिस ठाण्यातच मारहाण केल्याची संतापजनक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून, त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सुषमा अंधारे यांच्या ट्विटनुसार, शिवा तायडे असे या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. तो मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आहे. त्याच्यावर पोलिस ठाण्यातच एका महिलेला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी भाजपसह राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपचा स्थानिक पुढारी तथा मलकापूर जिल्हा बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती शिवा तायडे या गावगुंडाने शहरातील पोलिस ठाण्यातच एका महिलेला मारहाण केली. थोर ते गृहमंत्री व थोर ते पोलिस कर्मचारी, असे सुषमा अंधारे यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विट करताना म्हटले आहे.

काय आहे व्हिडिओत?
सुषमा अंधारे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत दिसून येत आहे की, पोलिस ठाण्यातील एका बाकड्यावर एक महिला एका तरुणासोबत बसलेली आहे. भाजप पदाधिकारी शिवा तायडे अचानक या खुर्चीवरून उठून या महिलेकडे येतो आणि तिला मारहाण करतो. यावेळी अन्य एक महिला व पोलिस कर्मचारी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात. पण शिवा तायडे या सर्वांना बाजूला सारून सदर महिलेला मारहाण करतो. एवढेच नाही तर सदर महिलेच्या बचावासाठी धावलेल्या दुसऱ्या महिलेलाही ते मारहाण करताना व्हिडिओत दिसून येत आहेत. शिवा तायडे व सदर महिला कोणत्या प्रकरणात पोलिस ठाण्यात पोहोचले होते हे अद्याप कळले नाही. पण सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर सोशल मीडियात संतापाची लाट उसळली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!