ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बुलाढाण्याचा बब्या ठरला हन्नुर केसरीचा मानकरी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

उपसरपंच सागर कल्याणशेट्टी मित्र परिवाराच्यावतीने आयोजित हन्नूर केसरी बैलगाडा शर्यतीत खंडेश्वरी प्रसन्न ईश्वर आटोळे यांचा बाळ्या ( बारामती) व फौजी ग्रुप (बुलढाण) यांच्या बब्याने प्रथम क्रमांक पटकावित हन्नूर केसरीचा मान पटकावला.सालाबादाप्रमाणे यंदाही ही शर्यत मोठ्या उत्साहाने पार पडली.प्रारंभी सकाळी या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी व संयोजक सागर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी अक्कलकोट तालुक्यातून व एकंदरी जिल्ह्यातून १२७ बैल जोडयांनी सहभाग नोंदवला.सकाळी ९ वाजता शर्यत सुरू झाली.

यात जिल्हा गटातून ४२ व तालुका गटातून ८५ बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या.सांगोला बुलढाणा पंढरपूर, माढा मोहोळ आदी भागातून बैलगाडा शर्यतीतील बैलगाडा प्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.सायंकाळी बैलगाडा शर्यतीचे बक्षीस वितरण पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. उपस्थित बैलगाडा प्रेमींना मार्गदर्शन करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार कल्याणशेट्टी यांच्या कार्यपद्धतीचे व विकासकामांचे कौतुक केले. विकास करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर पणे आहोत,असे गौरवोउद्गार त्यांनी काढले.

खरे तर मी देखील एक बैलगाडा शर्यतीचा प्रेमी आहे.जिथे बैलगाडा शर्यत असते तिथे मी गेल्याशिवाय राहत नाही,या शब्दात बैलगाडा शर्यतीचे बैलगाडा प्रेमाचे त्यांनी वर्णन केले आणि सागर कल्याणशेट्टी मित्र परिवाराच्या नियोजनाचे कौतुक केले. आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, शेतीप्रधान देशामध्ये बळीराजाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होत आहे.पालकमंत्री गोरे हे सुद्धा बैलगाडा प्रेमी आहेत.त्यांनी आवर्जून या उपक्रमाला भेट देऊन शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने बळ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

यावेळी भाजपा कार्यकारणी सदस्य शहाजी पवार, शिवसेनेचे अमोल बापू शिंदे,माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, माजी उपनगराध्यक्ष महेश हिडोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य आण्णाराव बाराचारी, संतोष पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर मचाले,चनबसय्या कौटगी,
सुनील कळके,विलास गव्हाणे,निंगप्पा पुजारी,महेश पाटील,संजय बाणेगाव,बाबा टक्कळगी,कांतू धनशेट्टी,अमोल हिप्परगी, तम्मा पाटील,राहुल काळे,उमाकांत  गाढवे,अश्रफ पटेल आदींची उपस्थिती होती.बैलगाडा शर्यत यशस्वी होण्यासाठी राम पारतनाळे, शरणाप्पा हेगडे, सिद्राम पुजारी,गौतम बाळशंकर, अनिल तळवार, गणेश सगळे, अर्जुन जळकोटे, सचिन जळकोटे प्रवीण कोरे,किरण हेगडे, भरत टिकंबरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम बाळशंकर यांनी केले.
महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती. ही शर्यत पाहण्यासाठी चपळगाव व हन्नूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान

खंडेश्वरी प्रसन्न ईश्वर आटोळे यांचा बाळ्या ( बारामती) व फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बब्या प्रथम क्रमांक २ लाख ११ हजार रुपये, कलप्पा येगप्पा पुजारी (हन्नूर) द्वितीय १ लाख ११ हजार रुपये,मल्लु सोनार (चपळगाव) तृतीय ५१ हजार रुपये,चौथे बक्षीस ३५ हजार भैरवनाथ प्रसन्न संतोष घोडके करकंब (पंढरपूर) ,पाचवे बक्षीस ३० हजार रुपये बागडे बाबा अटपडकर उपरवाडी तर सहावे बक्षीस अमोल मणुरे व राहुल वाघमारे हन्नूर यांना २५ हजारांचे देण्यात आले.विजेत्यांना मानाची ढाल रोख रक्कम देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group