सोलापूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असतांना यात आरोप प्रत्यारोप देखील होत आहे. नुकतेच इचलकंरजीतील एका सभेत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
खोत म्हणाले कि, विरोधात असणारे सगळेच भ्रष्टाचारी असून एका एकाला तुरुंगात घाला, असे विधान त्यांनी केले आहे. जे जे गडी विरोधात आहे, ते सगळे भ्रष्टाचारी आहेत. एका एका गड्याला आत घालायला सुरूवात करा, सगळे गडी रांगत रांगत चालायला लागतील. पण सरकार फक्त भीती दाखवते आणि सोडून देते, असे करू नका, असे विधान खोत यांनी केले आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, विरोधात आहे ते सगळे भ्रष्टाचारी आहेत. सरकारने यांच्या फाईली वर काढाव्या. हे गडी हुशार आहेत, चांगले कपडे आणि जॅकेट घालून जनतेपुढे येतात. गोड गोड बोलतात, जनतेला वाटते की कोणी मोठा गडी आला, पण तो मोठा गडी नसतो, अशा गड्यांना मातीत घाला, तरच महाराष्ट्र सन्मानाने उभा राहू शकतो.
कुणी काहीही म्हणू द्या, पण देवेंद्र फडणवीस यांना मानतो. लोक म्हणतात काही झालं तरी ईडी मागे लावतात. पण मी म्हणतो ईडीची गती वाढवा. गडी एकतर आपल्यात आला पाहीजे. नाहीतर घाबरून मेला पाहीजे, असे सदाभाऊ खोत म्हणाले होते.
50 वर्षे मोहिते पाटील यांच्या घराकडे पंचायत समिती पासून ते राज्यापर्यंत सत्ता होती. या लोकांना सत्तेचा हव्यास आहे. भाजप सत्तेत आल्यावर मोहिते पाटील भाजपमध्ये आले. भाजपने त्यांना खूप काही दिले मात्र, ते विसरले. त्यांनी अनेक कारखाने, पतसंस्था उध्वस्त केल्या. आता त्यांचा वाडा उध्वस्त करण्याची वेळ आली आहे, अशी टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.