---Advertisement---

सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार ; उपमुख्यमंत्री फडणवीस !

By team
On: January 11, 2024 9:01 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

विधानसभा अध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला देत आज दिलेल्या आदेशानंतर आता कुणाच्याही मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही, असे सांगतानाच, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

‘एक्स’ या संदेश मंचावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णतः पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबूत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते. पण काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. पण आता तरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!