ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठा आता पहिल्यासारखा राहिला नाही ; मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचा दौरा व सभा जोरदार सुरु असतांना आता बैठकीचे नियोजन सुरु आहे, या दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी सरकारसह मंत्री भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, सरकारला मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेच लागतील. निष्पाप लोकांना अडकविण्याचा प्रयत्न केला तर आमचंही लक्ष आहे. केसेस मागे घेतल्या नाहीत तर आम्ही पुढे बघू असे थेट आव्हानच त्यांनी सरकारला दिले आहे. छगन भुजबळांनी आपल्या नादाला लागू नये आणि त्याचं ऐकून सरकारने मराठ्यांवर अन्याय करू नये, मराठा आता पहिल्या सारखा राहिलेला नाही असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

बीडमध्ये ज्यांनी कोणी जाळपोळ केली त्याचं समर्थन आम्ही केले नाही. मात्र निष्पाप लोकांवर कारवाई करून अटक केली जात असेल कर तुम्ही भोळे बनू नका. मराठ्यांना माहीती आहे तुम्ही आरक्षणासाठी काय करत आहात. आज सरकार हातात आहे म्हणून झोडून काढणार का ? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. भुजबळ म्हणत आहेत की मी खूप जणांना अंगावर घेतले. परंतू त्यांची गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा असाही इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. कोणताही सर्वे नाही तर ते त्यांना फुकटचं खायला जमतं. आमच्या नोंदी सापडतायत तर देणार नाही म्हणतात. ही तर दादागिरी झाली. आम्हाला कुणाचं देऊ नका, आमचं आहे ते आम्हाला द्या अशीही मागणी त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!