---Advertisement---

मुहुर्त साखरपुड्याचा..पण लग्न उरकले!

By team
On: July 30, 2025 2:50 PM
Follow Us:
---Advertisement---

चपळगाव : प्रतिनिधी

रविवारचा दिवस शुभ मुहूर्ताचा असल्याने अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यादिवशी साखरपुडा मुहूर्त होता,पण लग्नाचा तिथी नसतानाही बऱ्हाणपूर येथील नागेशी तर शिरवळ येथील तानवडे परिवारातील सदस्यांनी एकत्रित येत लोकप्रतिनिधींच्या विचारविनिमयातुन साखरपुड्यातच लग्न उरकले.दोन्ही कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला.

अक्कलकोट तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील परमेश्वर नागेशी यांची मुलगी प्रिती तर शिरवळ येथील विश्वनाथ तानवडे यांचा मुलगा संतोष या दोघांचा साखरपुड्यातच लग्न उरकण्यात आला.दोन्ही परिवाराची वाटचाल ही शेतीवरच अवलंबून आहे.

सध्याचे दिवस हे महागाईचे आहेत.सर्वसामान्यांना शुभकार्य करत असताना कंबरडे मोडले जात आहे.ही वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन उपस्थित लोकप्रतिनिधींनी साखरपुड्यातच उरकण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने घेतला.यामुळे अनावश्यक खर्च,वेळ व शारीरिक कष्ट वाचले गेले.

यासाठी विजय तानवडे,बसवराज तानवडे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद तानवडे,सरपंच वर्षा भंडारकवठे,सिध्दाराम भंडारकवठे,राजु कोळी,राजु जवळगे,प्रशांत तानवडे,बसवराज बिराजदार,परमेश्वर बिराजदार,शिवा तानवडे,जाफर मुल्ला,अजित वदलुरे,विजय बिराजदार,निलप्पा तानवडे,कस्तुरी तानवडे,लक्ष्मी तानवडे,अजित तानवडे,संतोष भंडारे,शंकराचार्य मठपती,पंचप्पा चितळे,सरपंच गौस मुजावर, उपसरपंच पद्मसिंह बनसोडे, पंचायत समितीचे माजी सदस्य खय्युम पिरजादे,सैद पिरजादे,गफ्फार पिरजादे,माजी सरपंच कविता हाल्लोळे,अश्रफ अली पटेल,अब्दुलहमीद पिरजादे,शाम बंदिछोडे,रवि इरवाडकर,नागेश बऱ्हाणपूरकर,मानप्पा गूगळे आदींनी विचार करून हा निर्णय घेतला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!