ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधानसभा निवडणुकीची ‘लिटमस टेस्ट’ होती ; ठाकरेंचा दावा

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील यशानंतर आज विजयी उमेदवारांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या विजयाचा जोरदार जल्लोष केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी सिनेटची निवडणूक ही आगामी विधानसभा निवडणुकीची ‘लिटमस टेस्ट’ होती असा दावा केला. तसेच विधानसभा निवडणुकीतही असाच विजयाचा गुलाल उधळण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.

सिनेटच्या निवडणुकीत आमचे 10 पैकी 10 उमेदवार विजय झाली. विजय काय असतो हे आम्ही दाखवून दिले. असाच विजय आम्हाला विधानसभा निवडणुकीत मिळवायचा असून, ही त्याची केवळ सुरुवात आहे, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाने भाजप कार्यालयातून घ्यावी, असा टोलाही त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाला हाणला.

आदित्य ठाकरे म्हणाले, सिनेटच्या निवडणुकीत आमचे 10 पैकी 10 उमेदवार विजय झाले. आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. विजय काय असतो हे आम्ही काल दाखवून दिले. असाच विजय आपल्याला येत्या विधानसभेत मिळवायचा असून, ही त्याची सुरुवात आहे. मागील 2 वर्षांपासून या निवडणुकीची तयारी केली जात होती. पण सरकारकडून ही निवडणूक लांबणीवर टाकली जात होत होती. सिनेट निवडणुकीसाठी आमच्या पक्षाने ऐतिहासिक नोंदणी केली होती. एवढी नोंदणी 40 गद्दार पक्षात असतानाही झाली नव्हती. याला घाबरून भाजप व मिंधे सरकारने ही निवडणूक दोनदा रद्द केली. त्यानंतर आमची नोंदणी 13 हजारांपर्यंत कमी करण्याचे कारस्थान रचले. पण त्यानंतरही आम्हाला या निवडणुकीत 90 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावर असलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!