---Advertisement---

त्याच माणसाच्या हातून पक्ष सुटला : शर्मिला ठाकरेंची टीका !

By team
On: January 17, 2024 3:52 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापूर्वीच शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणी निकाल लागला असून यानंतर अनेक पक्षातील नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे तर आता खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अर्धांगिणी शर्मिला ठाकरे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या माणसामुळे अनेक नेत्यांना शिवसेना सोडावी लागली, त्याच नेत्याच्या हातातून आज पक्ष सुटला. यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाले, असे त्या म्हणाल्यात.

मनसेने विक्रोळीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, या महिन्याच्या 10 तारखेला एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. शिवसेनेतील बड्या नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावे लागले होते, त्याच माणसाच्या हातून या दिवशी पक्ष सुटला.

गत 10 जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्वाळा दिला होता. या पार्श्वभूमीवर शर्मिला ठाकरे बोलत होत्या. तत्पूर्वी, डिसेंबर महिन्यात शर्मिला यांनी दिशा सालियन प्रकरणात उद्धव यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली होती. या प्रकरणी आदित्य यांच्या अंगावर शिंतोडे उडवण्यात येत असले तरी तो तसे काही करेल असे मला वाटत नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.

त्यानंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आभार मानण्याची वेळ मला उद्धव ठाकरेंनी आयुष्यात केव्हाच दिली नाही. किणी प्रकरणापासून आजपर्यंत मिळेल तेव्हा त्यांनी आमचे चिमटे काढले. निदान जो भाऊ त्यांच्यासोबत लहानपणापासून मोठा झाला, त्याच्यावर थोडातरी त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे होता. मी माझ्या पुतण्यावर (आदित्य ठाकरे) विश्वास ठेवला. पण त्यांनी आपल्या भावाला केव्हाच मदत केली नाही. त्यांनी आम्हाला केवळ टोमणे मारले, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!