---Advertisement---

शेअर बाजार कोसळला, तेल कंपन्यांचे शेअर धडाधड पडले !

By team
On: January 8, 2026 5:04 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था : डोनाल्ड ट्रम्प यांनी 500 टक्के टॅरिफबाबत केलेल्या विधानानंतर भारतात मोठी खळबळ उडाली असून त्याचे तीव्र पडसाद थेट भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. या घोषणेनंतर बाजारात घबराट पसरली आणि सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली. विशेषतः तेल कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणात घसरल्याने गुंतवणूकदारांची चिंता अधिकच वाढली आहे.

गुरुवारी सेन्सेक्स जवळपास 200 अंकांच्या घसरणीसह उघडला. बाजारात विक्रीचा जोर वाढत गेला आणि दुपारी 2.30 वाजता सेन्सेक्स सुमारे 600 अंकांनी घसरून 84,360 अंकांवर व्यवहार करत होता. काही वेळेस बाजारातील एकूण घसरण 26 हजार कोटी रुपयांहून अधिक झाली. ही घसरण भारतीय शेअर बाजारासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

या घसरणीमागे मुख्य कारण म्हणजे रशियन तेलावर होणारा संभाव्य दबाव. भारत हा रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करणारा देश आहे. अमेरिकेत ‘सँक्शनिंग रशिया ॲक्ट ऑफ 2025’ हे नवीन विधेयक सादर करण्यात आले असून, त्यामागे डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा डाव असल्याचे सांगितले जात आहे. या विधेयकामुळे रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

या यादीत भारतासह चीन आणि ब्राझीलसारख्या देशांचा समावेश असल्याने भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. पुढील काही दिवस बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात असून गुंतवणूकदार सावध पवित्रा घेताना दिसत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!