---Advertisement---

राज्यात तापमान वाढले : थंडीचा जोर झाला कमी !

By team
On: January 16, 2025 3:15 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्यात थंडीचा धुमाकूळ सुरु असतांना आता मध्य महाराष्ट्रासह बहुतांश भागात किमान तापमान सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक नोंदवले जात आहे. पुणे, नाशिक, मुंबई या भागातील तापमान 12 ते 16 अंशापर्यंत नोंदवले जात आहे. तर मराठवाड्यामध्ये 18 ते 20 अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान येत्या 24 तासात राज्यात पुन्हा तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील तापमानात अंदाजे दोन अंशांनी वाढ नोंदवली जाणार असून विदर्भात मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

राज्यात मागील दोन दिवसापासून किमान तापमानाचा पारा कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ-उतार होताना नोंदवले जात आहे. त्यातच अवकाळी पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने राज्यातील शेतकरी धास्तावले होते. मात्र अद्याप तरी अवकाळी पावसाचा फटका राज्यातील कोणत्याच भागाला बसलेला नाही. मात्र, यादरम्यान नागरिक मात्र उकाड्याने हैराण झाले होते. पहाटे आणि संध्याकाळी हलका गार वारा आणि धुक्याची चादर याचा परिणाम मात्र राज्यातील नागरिकांना सहन करावा लागला.

दरम्यान बुधवारी राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापामान हे दहा अंशांच्या वर गेले होते. तर कोकण किनारपट्टी परिसरामध्ये काही भागांमध्ये 20 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. यात रत्नागिरी 21 अंश तर सिंधुदुर्गात 23 अंशापर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर पुण्यात देखील सामान्य तापमानाच्या तुलनेत तापमानात वाढ नोंदवण्यात आली. मराठवाड्यात तापमानाचा पारा सोळा ते अठरा अंशावर येऊन थांबला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही तापमान वाढले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!