---Advertisement---

हवेत गोळीबार करीत तिघांनी लुटले सोन्याचे दुकान

By team
On: July 29, 2024 9:52 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात चोरीच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खारघरमध्ये दरोडेखोरांनी फिल्मी स्टाइल सोन्याचे दुकान लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दरोडेखोर अचानक दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खारघर सेक्टर 35 येथील बीएम ज्वेलर्सवर रात्री 11 च्या सुमारास दरोडा पडला. यावेळी तीन दरोडेखोर दुकानात शिरले, त्यांच्या हातामध्ये बंदुका होत्या. तेथील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सोन्याचे दुकान लुटले. शिवाय दुकानातून जातांना त्यांनी हवेत गोळीबार देखील केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

विशेष म्हणजे, भरबाजारात ही घटना घडली आहे. दरोडेखोरांनी बंंदुकीच्या धाकावर सोन्याचे दुकान लुटले. त्यांनी दहशत माजवण्यासाठी हवेत गोळीबार देखील केला. या घटनेमुळे नागरिक आणि व्यवसायिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!