मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील विकासकामाची चर्चा सुरु असतांना नुकतेच ठाण्यातील शहापूर परिसरातील समृद्धी महामार्गावर भला मोठा खड्डा पडला आहे. त्याचे कारण म्हणजे ऐन पावसाळ्यात या महामार्गावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे समृद्धीच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्याचा प्रसिद्ध समृद्धी महामार्ग नेहमीच अपघाताने चर्चेत येत असतांना आता नवीन चर्चा देखील सुरु झाली आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात भगदाड पडल्याची घटना समोर आली आहे. मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाला कोणतीही बाधा येऊ नये म्हणून या महामार्गावर गावागावांना जाण्यासाठी वेगळे रस्ते आणि पूल तयार करण्यात आले आहे. मात्र याच पूलाला भगदाड पडल्याचे दिसून आले आहे. याचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहे. शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील शेरे – बावघर – शेंद्रूण गावांना जोडण्यासाठी बनविण्यात आलेल्या पूलावर मोठे भगदाड पडले आहे. या पुलावरून सतत वाहतूक सुरू असते अश्यात वाहनांचा मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे समृद्धी महामार्गावर केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.