ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं” ; मुख्यमंत्र्यांचा टोला !

मुंबई : वृत्तसंस्था

महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदानप्रक्रियेत फेरफाराच्या संशयास्पद दाव्याने खळबळ उडवली असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (9 ऑगस्ट) त्यांच्या आरोपांचे सडेतोड खंडन केले. शरद पवार यांनी दिल्लीत दोन व्यक्तींनी 160 मतदारसंघांत विजय मिळवून देण्याचा प्रस्ताव दिल्याचा खुलासा केला होता. यावर फडणवीसांनी पवारांना “पळपुटे” संबोधत, “रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं” असा टोला लगावला.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “शरद पवार यांनी यापूर्वी कधीही ईव्हीएमवर शंका उपस्थित केली नव्हती. उलट, त्यांनी ईव्हीएमला दोष देणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले होते. पण राहुल गांधी यांच्या भेटीनंतर अचानक त्यांना मतदानप्रक्रियेत फेरफाराची आठवण झाली. ही राहुल गांधींच्या भेटीची जादू आहे की काय?”

फडणवीसांनी पुढे विरोधकांवर टीका करताना म्हटले, “भारतासारखी पारदर्शक निवडणूक प्रक्रिया जगात कुठेही नाही. ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर आरोप करणारे जनतेत बोलतात, पण आयोगाने बोलावले की पळ काढतात. शपथपत्र द्यायला तयार नसतात. कारण त्यांना माहिती आहे, खोटं पकडलं गेलं तर फौजदारी कारवाई होऊ शकते. हे पळपुटे लोक रोज खोटं बोलून पळून जातात.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!