ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आध्यात्मिक परंपरेचा हा भव्य उत्सव ; पंतप्रधान मोदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील प्रयागराज येथे आजपासून महाकुंभ मेळावा सुरु झाला आहे. याठिकाणी लाखो भाविक, साधू आणि संत पौष पौर्णिमेच्या शाही स्नानात सहभागी झाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर पोस्ट करत या सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय आध्यात्मिक परंपरेचा हा भव्य उत्सव तुम्हा सर्वांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह घेऊन येईल अशी आशा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

पौष पौर्णिमेच्या पवित्र स्नानाने प्रयागराजच्या पवित्र भूमीवर आज महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी हा एक अतिशय खास दिवस आहे. आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीशी संबंधित या दिव्य प्रसंगी, मी सर्व भक्तांना माझे मनापासून अभिवादन आणि शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान मोदी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

आज सकाळी सुमारे ६० लाखांहून अधिक भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभमेळ्यात ४० कोटींहून भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. १४४ वर्षांनी दुर्मिळ संयोग जूळून आलेल्या महाकुंभ २०२५ ची सुरुवात आज प्रयागराजमध्ये पौष पौर्णिमेच्या पहिल्या स्नानाने झाली. या अमृतमय महाकुंभात देश आणि विदेशातील ४५ कोटींहून अधिक भाविक, साधू, संत ‘श्रद्धेचे डुबकी’ घेतील, असे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!