ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…अन्यथा कायदेशीर लढा देऊ; आदित्य ठाकरे यांचा इशारा

मुंबई : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीत अमोल कीर्तिकर यांच्याबाबत दिलेला निकाल संशयास्पद आहे. निवडणूक आयोगाने त्यावर योग्य प्रकारे कारवाई करावी, अन्यथा कायदेशीर लढा देऊ, असा इशारा शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी दिला. लोकसभेच्या या निवडणुका पारदर्शक झाल्या असत्या तर भाजपला ४० जागासुद्धा जिंकता आल्या नसत्या, असा हल्लाबोलही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत हा इशारा देताना आदित्य यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले. अनिल परब, अनिल देसाई, आ. भास्कर जाधव सुनील प्रभू, प्रियंका चतुर्वेदी आदी यावेळी उपस्थित होते. देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असला तरी मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील तिढा मात्र अजूनही सुटलेला नाही. अशातच ईव्हीएम मशीन हॅकची चर्चा सुरू झाली. आदित्य यांनीही आता उत्तर-पश्चिमच्या निकालावरून निवडणक आयोगाच्या भमिकेवर संशय व्यक्त केला आहे. या मतदारसंघात राज्य निवडणूक आयोगाने पारदर्शक काम केले नाही. ‘इंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन’ पद्धतीने त्यांनी काम केल्याचा आरोप आदित्य यांनी केला. संपूर्ण निवडणूक पारदर्शक आणि कामकाज चोख झाले असते तर भाजपच्या २४० सोडाच ४० ही जागा आल्या नसत्या. या मतदारसंघात शिवसेनेचा ठाकरे) पराभव हा राजकीय दबाव वापरून केलेला आहे. पण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहन याचा पाठपुरावा करून झालेल्या पराभवांचे रूपांतर विजयात करू, असे आदित्य म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!