---Advertisement---

अक्कलकोट देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हल्स अपघात !

By team
On: June 10, 2025 4:03 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

पुण्यातून अक्कलकोटच्या देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्स बसचा सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर भीषण अपघात झाला. कर्जाळा (ता. सोलापूर) येथील वळसंग परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या बसने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे १५ ते २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिलांचा आणि पुरुषांचा समावेश असून जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

अपघात इतका जबरदस्त होता की, बसच्या डाव्या बाजूचा मोठा भाग चक्काचूर झाला. बसमध्ये एकूण ३० ते ३५ भाविक प्रवास करत होते. धडकेनंतर झालेल्या गोंधळात स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. पोलिस आणि रुग्णवाहिकांनाही तात्काळ पाचारण करण्यात आलं. जखमींना अक्कलकोट आणि सोलापूर येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स बस अतिवेगात होती आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली. धडक इतकी जबरदस्त होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. या अपघातानंतर काही काळ सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. अपघातग्रस्त वाहनांना मार्गावरून बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांकडून तपास व मदतकार्य सुरु आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!