---Advertisement---

महामार्गावर तिहेरी अपघात : तिघांचा होरपळून मृत्यू

By team
On: February 17, 2024 10:47 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना गेल्या काही महिन्यापासून पुणे – नाशिक महामार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत आहे. नुकतेच पेट घाटात भीषण अपघात झाला आहे. पेट घाटात टेम्पो, कंटेनर आणि कारचा तिहेरी अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा होरपळून मृत्यू झालाय, तर एक गंभीर जखमी आहे.

अपघातात कारने अचानक पेट घेतला. त्यामुळं तिघांचा आगीत होरपळून मृत्यु झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. पहाटे सहा वाजेदरम्यान हा अपघात झाला आहे. घाटात उतारावर कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यामुळं हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातामुळे महामार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. रोहिदास राक्षे, विराज कदम, आणि अंकुश भांबुरे असे अपघातात होरपळुन मृत्यु झालेल्या तरुणांची नावे आहेत. हा अतिशय भीषण अपघात होता. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे. या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्त्यावर सर्वत्र रक्त पडलेले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!