---Advertisement---

“ट्रम्प काहीही म्हणो, मोदी महानच!” ; फडणवीसांचा ठाम पवित्रा

By team
On: September 7, 2025 10:47 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई  : वृत्तसंस्था

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या सूचक टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे जोरदार समर्थन केले आहे. “ट्रम्प काहीही म्हणो किंवा न म्हणो, पंतप्रधान मोदी हे एक महान नेते आहेत,” असे विधान करत त्यांनी मोदींवर ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

दक्षिण मुंबईतील त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात केल्यानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकांना गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले. त्याच वेळी अमेरिकेच्या भूमिकेबाबत विचारले असता त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर ठाम भूमिका मांडली.

“आज भारत नव्या उंचीवर आहे. आम्ही आमचे परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो. कोणीही आम्हाला ते लादू शकत नाही. ट्रम्प यांचं मत त्यांचं आहे, पण संपूर्ण जगातील नेते मोदीजींना महान नेते मानतात. काही जण आमची प्रशंसा करतात, तर काही खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. पण हा नवीन भारत आहे – मोदीजींचा भारत!” असे ठाम शब्दांत फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली.

दरम्यान, ट्रम्प यांनी नुकत्याच दिलेल्या एका वक्तव्यात पंतप्रधान मोदींची मैत्री कायम ठेवण्याची भूमिका घेतली असली, तरी भारताच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली होती. विशेषतः भारताने रशियन तेल खरेदीवर लावलेल्या अतिरिक्त शुल्कामुळे अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील शुल्क वाढवले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

भारताने अमेरिकेच्या या भूमिकेला “अन्याय्य आणि अवास्तव” असे ठासून सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!