---Advertisement---

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुण ठार

By team
On: April 28, 2024 10:43 AM
Follow Us:
---Advertisement---

हिंगोली : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील राहुली पाटीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हिंगोलीच्या त्र्यंबकनाका राहुली पाटी परिसरात हा भीषण अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात झाल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. वैभव पाटील आणि शुभम पारसकर, अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेने दोन्ही तरुणांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या तरूणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्यभरात राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. काल रात्री (२७ एप्रिल) हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोन्ही तरुण खासगी कामानिमित्त सेनगाव मध्ये गेले खाजगी कामानिमित्त हिंगोली वरून सेनगाव शहरात गेले होते. रात्री सात वाजता परतीच्या दरम्यान हिंगोली शहराच्या जवळ असलेल्या राहुल पाटी जवळ येताच समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत दोन्ही तरुणांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी या तरुणांना धडक देणाऱ्या वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

हिंगोली ग्रामीण पोलिसांनी दोघांचेही मृतदेह हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. हिंगोलीमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरूणांचा मृत्यू झालाय. सध्या वाहनांचा भरधाव वेग हे अपघाताचे प्रमुख कारण आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!