---Advertisement---

ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर

By team
On: October 26, 2024 5:13 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था

विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

१६४ वर्सोवा – हरुन खान
१६९ घाटकोपर पश्चिम – संजय भालेराव
१६७ विलेपार्ले – संदिप नाईक

उद्धव ठाकरे ह्यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणखी तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून ही यादी ट्वीट करण्यात आली आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी काही वेळापूर्वीच दुसरी यादी जाहीर केली होती. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत ६५ उमेदवार होते. त्यानंतर आज दुसरी यादी जारी करण्यात आली आहे. या यादीत १५ नावांचा समावेश आहे. त्यानंतर आणखी ३ उमेदवारांची नाव जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत शिवसेना ठाकरे गटाने भायखळा मतदारसंघात शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याविरोधात मनोज जामसुतकर यांना उतरवलं आहे. वडाळ्यातून माजी महापौर श्रद्धा जाधव, तर शिवडीतून विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आलीय. चार दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अनुराधा नागवडे यांना श्रीगोंद्यातून उमेदवारी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!