---Advertisement---

अजित पवार गटाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील !

By team
On: June 17, 2025 3:32 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक मोठे पक्ष सोहळे होत असल्यामुळे दादांच्या गटाची ताकद वाढत असतांना आता सोलापुरात देखील सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी स्वीकारले.

दीपक साळुंखे हे विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते. त्यासाठी अनेकांनी फिल्डींग लावली मात्र सोलापूर शहराला आक्रमक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे उमेश पाटील यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ अजित पवार यांनी घातले आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेश पाटील हे सुद्धा पक्षावर नाराज होते त्यांनी तशी नाराजी व्यक्त करून दाखवली. शरदचंद्र पवार गटात जाण्याची शक्यता त्यावेळेस वर्तवली गेली मात्र आपला नेता अजित पवार हेच माणून त्यांनी कोणत्याही पक्षात न जाता केवळ यशवंत माने यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी दंड थोपटले होते आणि अजित पवारांना दिलेल्या शब्दानुसार त्यांनी मोहोळ मध्ये यशवंत माने यांचा पराभव केला.

त्यानंतर ते पुन्हा अजित पवारांच्या जवळ गेले अजित पवारांनी सुद्धा उमेश पाटलांचे दिलेल्या शब्दाला जागणारा कार्यकर्ता म्हणून कौतुक केले.

उमेश पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्याने आता सोलापूर जिल्ह्याचे राजकीय समीकरणे निश्चित बदलतील यात कोणतीही शंका नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात आक्रमक अभ्यासू चेहरा मिळाला हे मात्र नक्की.

उमेश पाटील (M.SC.Agri.)
पत्ता : सावली बंगला, ता.मोहोळ, जि.सोलापूर
Mob.9881740950
Email : [email protected]

आत्तपर्यंतच्या राजकीय कारिर्दीत पक्षाने विविध पदांच्या माध्यमातून दिलेल्या जबाबदाऱ्या

मुख्य प्रवक्ता : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश ( 2012 ते आतापर्यंत)
माजी प्रदेशाध्यक्ष : राष्ट्रवादी युवक काँग्रेस (2012-2015)
मा.जिल्हाध्यक्ष : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(2019-2023)
जिल्हा परिषद सदस्य,सोलापूर जिल्हा (7500 मताधिक्य) (2017-2022)
नियोजन समिती सदस्य सोलापूर (2017-2022) (निवडणूक लढवून)
प्रदेश सरचिटणीस ( 2008 पासून युवक प्रदेशाध्यक्ष पदाचा 3 वर्षाचा कार्यकाळ वगळता 2019 पर्यंत सातत्याने पक्षाच्या वरिष्ठ कार्यकारिणी मध्ये सरचिटणीस पदावर)
जिल्हा प्रभारी : नंदुरबार ( 2014 ते 2017)
निवडणूक निरीक्षक : लातूर मनपा (2011) केज विधानसभा पोटनवडणुक( 2012 – पृथ्वीराज साठे) मावळ लोकसभा(2019-पार्थ पवार)
राष्ट्रीय सरचिटणीस – राष्ट्रवादी यवक काँग्रेस (2009-2011)
प्रदेशाध्यक्ष : राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य (स्वतःची नोंदणीकृत कामगार संघटना)
जन्म : 24/02/1978

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!