अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे गुरुवारी रात्री झालेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अचानक पडलेल्या या पावसामुळे
पिकांचे मोठे नुकसान झाले असून कुरनूर- चुंगी रस्त्यावरील अशोक काजळे या शेतकऱ्यांचे पोल्ट्री फार्म शेड उध्वस्त झाले आहे.यात त्यांचे २ हजार पक्ष्यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे पोल्ट्री फार्मचे शेड उध्वस्त झाले असून अनेक पत्रे उडून गेले आहेत.
यावेळी पक्षी शेडमध्येच होते.कंपनीला बोलवून तात्काळ हे पक्षी इतरत्र हलवण्यात आले.३ हजार स्क्वेअर फुटाचा पत्रा शेड यात उध्वस्त झाल्याने सुमारे तीस ते चाळीस पक्षी यात मृत्युमुखी पडले आहेत.
शेती परवडेना म्हणून या शेतकऱ्याने पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरू केला मात्र अचानक पडलेल्या या अवकाळी पावसामुळे या व्यवसायातही अशी आर्थिक हानी झाली
आहे.अचानक नुकसानीचे संकट आल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली असून प्रशासनाने याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी
केली आहे