---Advertisement---

वडेट्टीवार यांचा खोचक टोला : अजित पवारांमागे काकांची पुण्याई !

By team
On: April 10, 2025 2:08 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी शरद पवार हेच आमचे दैवत आहेत. कालही आम्ही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. पण देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता मिळाला आहे. त्यांनी देशाची मान जगात उंचावली आहे. त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी हा निर्णय घेतला, असं वक्तव्य पिंपरीत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्कार कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. त्यावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारयांनी खोचक टोला लगावला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांचा दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो बीडच्या भाषणातही त्यांनी केला आहे. पुण्याई कोणाची तर आई-वडीलांची आणि चुलत्याची असे ते बोलले आहेत म्हणजे स्पष्ट आहे की, अजितदादांवर काकांची पुण्याई आहे. तसेच आता दिवस दूर नाही. ३ वर्षांनी ते कुठं दिसतील याचा अंदाज येणं सुरू झाले आहे, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

पुढे म्हणाले, परिस्थितीनुसार सर्वच जण बदलत आहे. अनेकांना बदलावे लागते. आता भाजपसोबत असलेली मंडळी तीन वर्षांनंतर कुठे दिसतील, पुढची निवडणूक कुणासोबत लढवतील, याचा अंदाज हळूहळू यांना येऊ लागला आहे. स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे लागणार आहे. याची तयारी दोन्ही पक्ष करणार नाही. तर अस्तित्व शून्य अशी परिस्थिती निर्माण होईल. दैवत म्हणून उल्लेख हा काकांची पुण्याई त्यांचा मागे आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!