---Advertisement---

सोलापूर, माढा लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर

By team
On: April 1, 2024 9:17 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीने सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी राहुल गायकवाड तर माढा लोकसभा मतदार संघासाठी रमेश बारसकर यांची उमेदवारी जाहीर केली. ‘वंबआ’चे सर्वसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केल्याने या दोन्ही मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

सोलापूर लोकसभेसाठी अॅड. प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस पक्षाला पाठिंबा देतील, असे बोलले जात आहे. परंतु ‘महाविकास आघाडी’सोबत त्यांची बोलणी फिस्कटल्याने त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले. गत वेळच्या निवडणुकीत अॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना १ लाख ७० हजार मते मिळाली होती. याचा फटका काँग्रेस पक्षाला बसला होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!