---Advertisement---

शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान येथे शनिवारी विविध कार्यक्रम

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव आणि उमरगा तालुक्यातील बोळेगाव सरहद्दीवर वसलेल्या स्वयं जागृत श्री शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान येथे शनिवार दि.२१ जानेवारी रोजी दिवसभर सद्गुरू श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात देश भक्ती कार्यक्रमासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे देवस्थान जागृत आहे.प्रत्येक शनी अमावस्या यात्रेस तुळजापूर, उमरगा, आंळद व अक्कलकोट तालुक्यातील भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.त्यामुळे यंदा यात्रा कमिटीच्यावतीने शनी अमावास्या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

शनिवार दि. २१ रोजी पहाटे श्री चे महापूजा, म्हारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होमहवन  इत्यादी कार्यक्रम होणार असून सकाळी सात वाजता घोळसगाव ग्राम प्रदक्षिणा करीत श्रीची भव्य पालखी मिरवणूक,विविध वाद्य समवेत श्री शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान पर्यंत निघणार आहे. यानंतर सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांचा दर्शन सोहळा, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम होणार असून भक्तांनी दर्शन आणि महाप्रसादचा लाभ घ्यावा, असे आवाहन एका पत्रकाद्वारे यात्रा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!