---Advertisement---

…जरा थांबा, मला राज्यात सरकार बदलवायाचे ; शरद पवार

By team
On: June 13, 2024 9:33 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

सरकारला अनुदान द्यावेच लागेल, नाही दिले तर रस्त्यावर उतरायला लागेल. चार, सहा महिने थांबा मला राज्य सरकार बदलायचं आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी केले.

सरकारला अनुदान द्यावेच लागेल, नाही दिले तर रस्त्यावर उतरायला लागेल. चार-सहा महिने थांबा मला राज्य सरकार बदलायचं आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचा आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. लोकसभेला साथ दिली त्याबद्दल आभार, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी काल बारामतीतील वकिल, डॉक्टर यांच्याशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजून घेतले होते. आज त्यांनी इंदापूर येथे शेतकऱ्यांची संवाद साधला आहे.

शरद पवार म्हणाले, पाणी चाऱ्या बाबत आता काही करू शकत नाही. मुंबईला गेल्यावर सरकारशी बोलेन. चार महिन्यांनी निवडणुका येतील, आमचा प्रयत्न आहे की काहीही करून सरकार बदलायच आहे. तोवर काही करू शकत नाही. पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी आपण सगळे एकत्रित असलो तर सरकार करेल, मी तुमच्या सोबत असेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. आजच्या घडीला संसार चालवायला दुधाचा धंदा हा एकमेव धंदा आहे. जेणेकरून प्रपंच चालतो. सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजेत ते निर्णय घेता येत नाहीत. माझ्याकडे १० वर्ष देशाच्या शेतीचे काम होते, त्या वेळी कर्जमाफी केली. शेतीमालाचे भाव वाढवून दिले. सत्तेचा वापर लोकांसाठी करायचे असतो. आज ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांना मी विनंती करतो, असंही पवारांनी सांगितले. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, नंदकुमार रणवरे, जयंत मोरे, अमोल भिसे, अशोक घोगरे, दशरथ पोळ, सोमनाथ ढोबळे, शरद जाधव, संतोष पोळ, वैभव जाधव यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!