---Advertisement---

विरोधी पक्षनेते गांधी असल्यावर आपल्याला चिंता करण्याची गरज नाही !

By team
On: December 16, 2023 5:04 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील काही राज्यात भाजपने मोठे यश मिळविल्यानंतर आता राज्यात देखील नेत्यासह कार्यकर्ते आगामी निवडणुकीत यश मिळविण्यासाठी बैठकीचे नियोजन सुरु झाले असून नुकतेच पदाधिकाऱ्याच्या बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. राहुल गांधी ईश्वराने भाजपला दिलेले वरदान आहे. विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा, यासाठी आपल्याला भाग्य घेऊन यावे लागते, असे देखील ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेसने केवळ स्वतःचा विचार केला म्हणून काँग्रेसची ही अवस्था झाली. पक्ष, संघटना याचे महत्त्व संपले. काँग्रेसचा नेता मोठा झाला, पण कार्यकर्ता राहिला नाही. देशातील सर्वात जुन्या पक्षात आज ज्या प्रकारची अवस्था दिसते, त्यानुसार हा पक्ष वर येणे कठीण आहे. भाजपमध्ये मात्र असे होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस तीन राज्यातील नव्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना म्हणाले की, काँग्रेसमध्ये मात्र असे होत नाही. तिथे ज्या नेत्याला बदलले जाते, तो पक्षाचीच कबर खोदतो. हे फक्त भाजपमध्येच शक्य होते. कालपर्यंत ज्याच्याकडे सर्वोच्च पद होते, त्याला सांगितले की, तुला आता दुसरे काम दिले जाईल, त्यावर तो नेता हसत हसत नवी जबाबदारी स्वीकारतो, हे केवळ आपल्या पक्षात होते असे म्हणत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ​​​

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!