---Advertisement---

वर्ध्याची घटना ताजी असतानाच कुंभारीजवळ विचित्र अपघात, सहा जणांचे प्राण वाचले

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि.२६ : दोन दिवसांपूर्वीची वर्ध्याची घटना ताजी असताना सोलापूरमध्ये पुन्हा एकदा विचित्र अपघात घडला आहे. सोलापूर – अक्कलकोट महामार्गावरील कुंभारी टोलनाक्याजवळ ही घटना घडली. सकाळी ट्रक व कारचा विचित्र अपघात झाला. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. वळसंग पोलिसांच्या सतर्कतेमुळे सहा जणांचे प्राण वाचले आहेत,अशी देखील माहिती समोर येत आहे.

२६ जानेवारी रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास कुंभारी येथील टोल नाका येथे ट्रक क्रमांक केए ३२ बी १७७७, कार क्रमांक एमएच २५ एएल ४०७०, बलकर ट्रक क्रमांक एमएच १२ सीएक्स ११७१ व ट्रक क्रमांक टीएन ५२ जे ३६७९ यांचा एकामागून एक धडक देऊन अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक अजय हंचाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दासरी, वाळूनजकार, बनकर, गायकवाड, होनमोरे, मोरे, सूर्यवंशी, काळोखे हे घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी क्रेनने कार व ट्रक मधील जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.

दरम्यान, अपघातातील मदतीचे कार्य दोन तास सुरू होते. ट्रकमध्ये अडकलेल्या ट्रक ड्रायव्हरला सुखरूप बाहेर काढून उपचाराकरिता हॉस्पिटलला दाखल केले आहे. वेळेत मदतकार्य झाल्याने मोठी जीवित हानी टाळणे शक्य झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!