---Advertisement---

राहुल गांधींच्या सभेला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित ?

By team
On: March 12, 2024 9:22 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता मैदानात उतरले असतांना काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची 17 मार्च रोजी शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडी बरोबरच इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेला उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाची सभा असल्याने, या सभेला विशेष महत्त्व असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. उद्धव ठाकरे यांनी न्याय यात्रेत सहभागी व्हावे, तसेच शिवाजी पार्क मध्ये होणाऱ्या सभेला देखील उपस्थित राहावे, यासाठी आम्ही निमंत्रण देण्यासाठी त्यांची भेट घेतली असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

महाविकास आघाडीमध्ये केवळ तीन ते चार जागांचा विषय बाकी राहिला आहे. हा विषय चर्चेने मार्गी लागू शकतो, असे देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी संवाद सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले. बाळासाहेब आंबेडकर यांना कोणत्या जागा हव्या आहेत, याची माहिती ते आम्हाला देणार होते. त्याची आम्ही प्रतीक्षा करत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!