---Advertisement---

फडणवीसांशिवाय सरकारमधील पानही हलत नाही ; मनोज जरांगे पाटील

By team
On: September 4, 2024 9:25 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच उपोषण करीत सरकारला धारेवर धरीत आहे. नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती.

यावेळी जरांगे पाटील म्हणाले कि, सागर बंगल्यावर कुणी गेला की फडणवीस त्याच्यावर जादू करतात, आगामी विधानसभा लढविण्याबाबत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांबाबत विविध कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली आहे, पण अद्याप निर्णय कोणताही झालेला नाही. पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की निवडणूक लढवायची की २८८ जणांना पाडायचे आहे. आम्ही आमची रणनीती उघड करणार नाही, नाही तर देवेंद्र फडणवीस डाव करतील.

फडणवीसांशिवाय सरकारमधील पानही हलत नाही.‌ मुख्यमंत्री कुणीही असो निर्णय फडणवीसच घेतात, असे सांगत जरांगे म्हणाले की, फडणवीस मराठाद्वेषी आहे त्यामुळे सगेसोयरेचा निर्णय होत नाही. आठ, दहा दिवसांपूर्वी भाजपचे आठ, दहा आमदार माझ्याकडे आले. त्यांना म्हटलं फडणवीस यांना जाऊन सांगा आरक्षण द्यायला. मात्र, ते सागर बंगल्यावर गेले आणि परत आलेच नाहीत. सागर बंगल्यात गेलेल्यावर फडणवीस जादू करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचावा यासाठी आम्ही नाटक आणलं होतं. त्यात तोटा आला. आम्ही आमच्या परीने पैसे दिले. तरीही फडणवीसांनी माझ्यावर खोटा खटला दाखल केला. मराठवाड्यात पावसाने नुकसान झाले. त्यांना सरकारची मदत मिळत नाही, असेही जरांगेंनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!