---Advertisement---

अक्कलकोट नगरपरिषदेवर १३ ठिकाणी येणार महिलाराज

By team
On: October 9, 2025 9:19 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीसाठीची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाले असून, यंदा नगरपरिषदेवर महिलाराज गाजणार आहे. १२ प्रभागांमधील एकूण २५ नगरसेवकांपैकी तब्बल १३ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिला उमेदवारांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण
निर्माण झाले आहे, तर अनेक इच्छुक पुरुष उमेदवारांनी मात्र सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.बुधवारी,नगरपरिषद सभागृहात प्रांताधिकारी सुमित शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके आणि अधीक्षक श्रीशैल बिराजदार यांच्या उपस्थितीत हा आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला.

विशेष म्हणजे, हा सोडत कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते पार पडला. प्रमिला राजे हायस्कूलच्या देविका शिंदे, श्रेया गवंडी, शहाबाज पठाण, आकाश माशाळकर
आणि हणमंत माशाळकर या विद्यार्थ्यांनी प्रभागनिहाय आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या.

🔹 प्रभागनिहाय आरक्षण तपशील :

प्रभाग क्रमांक १ – (अ) ओबीसी महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २ – (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३ – (अ) ओबीसी, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ४ – (अ) अनुसूचित जाती, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ५ – (अ) ओबीसी महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६ – (अ) ओबीसी महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ७ – (अ) ओबीसी, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ८ – (अ) ओबीसी महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ९ – (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १० – (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ११ – (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १२ – (अ) ओबीसी, (ब) सर्वसाधारण महिला, (क) सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक १ ते ११ मध्ये प्रत्येकी दोन नगरसेवक असतील, तर प्रभाग क्रमांक १२ मध्ये तीन नगरसेवक असतील. अशा प्रकारे एकूण २५ नगरसेवकांपैकी १३ नगरसेविका महिला असणार आहेत. नगरपरिषदेत महिलांचे प्रमाण जवळपास ५० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला सक्षमीकरणाला  चालना मिळणार आहे. अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असलेल्या महिला आता थेट नगरपरिषदेच्या मैदानात उतरण्याची तयारी करू लागल्या आहेत. आरक्षण सोडतवेळी
जेष्ठ नेते अशपाक बळोरगी, महेश हिंडोळे, अविनाश मडिखांबे, रईस टिनवाला, सद्दाम शेरीकर, बंटी राठोड, नन्नू कोरबू, शिवशरण जोजन यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपरिषदेच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी तयारीला वेग दिला आहे. काहींच्या चेहऱ्यावर आनंद तर काहींच्या चेहऱ्यावर विचारमग्न शांतता दिसून आली. मात्र, सर्वांच्या तोंडी एकच शब्द अखेर
आरक्षण जाहीर झाले.

 

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी मोठी फिल्डिंग

अक्कलकोट नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद यापूर्वी म्हणजे दोन दिवसांपूर्वी सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. त्यामुळे प्रमुख दावेदार मंडळी जे आहेत ते नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत.त्यांना जर संधी नाही मिळाली तर मात्र ते नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार आहेत.या पदासाठी मोठी फिल्डिंग पक्षश्रेष्ठीकडे लावण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!