---Advertisement---

योगींचा नवा नारा : ‘एक बार फिर मोदी सरकार’ ‘इस बार ४०० पार’

By team
On: January 17, 2024 10:25 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देश्बाह्रात आगामी २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा करीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘एक बार फिर मोदी सरकार’ आणि ‘इस बार ४०० पार’ हा नवा नारा दिला आहे. मोदींच्या विजयाच्या घोषणांनी भिंत रंगवण्याच्या मोहिमेचा त्यांनी गोरखपूरमधून मंगळवारी शुभारंभ केला आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठीत्यांनी पक्षाच्या घोषणांनी भिंती रंगवण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात, गोरखपूरच्या जटाशंकर येथील श्री. विश्वकर्मा भगवान पंचायत मंदिराच्या भिंतीवर योगींनी स्वतः कमळाचे फूल रेखाटले. या ठिकाणी त्यांनी ‘एक बार फिर मोदी सरकार’, ‘इस बार ४०० पार’ असा नारा लिहिला. यावेळी बोलताना योगी म्हणाले की, ‘विक्षित भारत संकल्प यात्रा’ सारखी मोहीम नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प प्रत्येकाने सोडला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संवाद कार्यक्रम तसेच निवडणुकीपूर्वी होणाऱ्या तीन मोठ्या रॅलीच्या दृष्टीने ही मोहीम अतिशय महत्त्वाची आहे. यात, सर्व खासदार, आमदार तसेच पंचायत आणि नगरपालिकेतील भाजपच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका पूर्ण जबाबदारीने पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!