---Advertisement---

आमदार लाड यांनी मानले अक्कलकोट तालुकावासीयांचे आभार,राष्ट्रवादीच्या नेतेमंडळीना दिले आभार पत्र

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२० : नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार अरुण लाड हे विजयी झाल्याने त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांचे
व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

रविवारी,लाड यांच्या काही जवळच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीपभाऊ सिद्धे,शहराध्यक्ष मनोज निकम, कार्याध्यक्ष माणिक बिराजदार, युवा नेते विक्रांत पिसे,शिवराज स्वामी यांची भेट घेऊन त्यांना आभार पत्र दिले आहे.आपण केलेल्या परिश्रमाचे फळ म्हणून आगामी काळात अक्कलकोट शहर आणि तालुक्यासाठी पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार लाड हे सतत प्रयत्नशील असतील, आपण कधी प्रश्न घेऊन यावेत, प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,अशी ग्वाही आलेल्या शिष्टमंडळाने दिले.यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष सिद्धे म्हणाले की, लवकरच पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही आमदारांचा सत्कार ठेवणार आहे.त्यावेळी तालुक्यातील प्रश्न त्यांच्यासमोर मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.आमदार लाड
यांच्या शिष्टमंडळामध्ये बापूसाहेब हारूगडे,प्रशांत लाड, सुखदेव यादव, श्यामसुंदर एडके, संजय पाटील या टीमचा समावेश होता. यावेळी तालुकाध्यक्ष दिलीपभाऊ सिद्धे, शहराध्यक्ष मनोज निकम, कार्याध्यक्ष माणिक बिराजदार, विक्रांत पिसे,शिवराज स्वामी,वाहिद वळसंगकर,
जया राठोड यांच्यासह कार्यकर्ते
उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!