---Advertisement---

गणेश शिंदे अक्कलकोटचे नवे मुख्याधिकारी; तीर्थक्षेत्र विकास, अतिक्रमण,स्वच्छता व पाणीपुरवठ्याकडे लक्ष देणार

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून गणेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा आठवड्यासाठी आयएएस प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी श्री अंकित यांची नियुक्ती करण्यात आली होती.त्यांनी आज पदभार सोडला.त्यानंतर शिंदे हे
नवे मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले आहेत.

शिंदे हे मूळचे नगर जिल्ह्यातले असून २०१० साली त्यांनी धारूर नगरपरिषदेमध्ये आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यांचा राहुरी,आरवी, तासगाव नगरपालिकेमध्येही मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावली.त्यानंतर ते अक्कलकोट येथे रुजू झाले आहेत.शिंदे हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात.अक्कलकोट शहरातील वाढते अतिक्रमण,अस्वच्छता याबाबतीत प्राधान्याने आपण लक्ष घालणार आहे.सर्व माहिती घेतली आहे. तसेच शहरात कोरोना नियंत्रणात आहे तो आणखी कमी कसा करता येईल,याकडे आपले लक्ष असेल तसेच तीर्थक्षेत्राच्या संदर्भात विविध योजना आणि प्रलंबित विकासकामे याबाबतही आपण खास करून लक्ष देणार असून तीर्थक्षेत्र विकासाची संधी आपल्याला मिळालेलीआहे.त्या संधीचे सोने करणार आहे.

प्रत्येक काम पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शहराची विकास कामे करणार आहे,असे पदभार घेतल्यानंतर शिंदे यांनी सांगितले. पदभार सोडल्यानंतर श्री अंकित हे पंचायत समिती अक्कलकोटचे नवीन गटविकास अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. विद्यमान गटविकास अधिकारी महादेव कोळी हे एक महिन्याच्या वैद्यकीय रजेवर गेलेले आहेत.आज सकाळी साडेदहा वाजता श्री अंकित हे कार्यभार स्वीकारला.त्यावेळेस पंचायत समितीचे सभापती सुनंदा गायकवाड व उपसभापती प्रकाश हिप्परगी यांनी त्यांचे स्वागत केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!