---Advertisement---

दुर्दैवी : ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहीरीत कोसळला, सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

On: December 12, 2020 12:07 PM
Follow Us:
---Advertisement---

कुर्डुवाडी (सोलापूर) : माढा तालुक्यातील शिंगेवाडी येथे ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या सहा वर्षीय चिमुकल्यावर काळाचा घाला आला. ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने या मुलाचा मृत्यू झाला. शंकर पांडुरंग शिंदे (वय 6, रा. शिंगेवाडी, ता माढा) असे विहिरीत पडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. 10) संध्याकाळच्या सुमारास घडली. ग्रामस्थ व नातेवाइकांनी सहा तासांनंतर मृतदेह व ट्रॅक्‍टर विहिरीच्या बाहेर काढला.

 

मुलाचे चुलते आकाश दत्तात्रय शिंदे यांनी दिलेल्या माहितीवरून कुर्डुवाडी पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे. मुलाचे वडील पाडुरंग यांनी दिवसभराचे शेतीचे काम करून ट्रॅक्‍टर विहिरीच्या बाजूला लावला होता. मुलगा शंकर हा ट्रॅक्‍टरमध्ये बसून होता. तेथील जमीन पावसाच्या पाण्याने खचलेली होती.

 

तसेच पाणी दिल्याने जमीन भुसभुशीत होऊन खचून ढासळली. उताराला असलेला ट्रॅक्‍टर अन्‌ त्यावरील मुलगा विहिरीत पडला. मुलाचे वडील, काका, नातेवाईक व ग्रामस्थ यांनी सुमारे पाच ते सहा तास प्रयत्न करून विहिरीतून ट्रॅक्‍टर – ट्रॉली व मुलगा शंकर याला बाहेर काढले. शंकर याचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलिस हवालदार पी. एस. दराडे याचा तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!